Quiet Time..
Monday, 8 March 2010
क्षितीज
क्षितीज जसे दिसते,
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून
घ्यावी कोणी.
गाय जशी हंबरते,
तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही;
अलगद भरूनी यावे.
कवी: ग्रेस
संकलक: प्रवीण कुलकर्णी
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment