Thursday, 11 March 2010

येथला प्रत्येक हंगाम


येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
पण पापणीलाच केस नसतो
आणि बुबुळांच्या काचा झालेल्या असतात रे
येथला प्रत्येक पिवविता कंजूषच असतो
म्हणून नुसते प्यालेच फोडून चालत नाही रे
इथे आतून पेटलेलाच आत्मा नसतो
आणि सृजनाचे कोळसे झालेले असतात रे
येथला प्रत्येक महाकवी आखूडच असतो
म्हणून शब्दांच्याच नजाकतीला भुलणं शोभत नाही रे
इथे माणसालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment