Sunday, 21 March 2010

आग


कालची बातमी खरी नाही
हाय, स्वर्गात भाकर नाही

देवदूता तुझा पगार किती?
का मला सांग नोकरी नाही?

येथली सर्व ही घरे माझी
सांग, मी कोणत्या घरी नाही?

मागता काय लेखणी माझी...
ही कुणाचीच बासरी नाही!

एकट्याचाच हा सवाल नसे
आग ही कोणत्या उरी नाही?

राहिले काय पूर्णिमेत अता?
चंद्र माझा उशीवरी नाही!


सुरेश भट
संकलक: प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment