Sunday, 21 March 2010

दर्शन


काळजांना कोंडवाडे;
न्याय? कुजलेले निवाडे!

मोजुनी मंत्रालयाचे
माफिया घेतील भाडे!

देशही विकतील कोणी
बांधण्या अलिशान वाडे!

तीच खोटी भाषणे अन
घोकलेले तेच पाढे!

मोजुनी घ्या अर्भकांच्या
बर्गड्यांची क्षीण हाडे!

चोच माराया भुकेली
थांबलेली ही गिधाडे!

मंगेश पाडगावकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment