Monday, 25 January 2010

वैरी

वाऱ्याने हलते रान
तुझे सुनसान
हॄद्य गहिवरले
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले....



डोळ्यांत शीण
हातांत वीण
देहांत फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून
निघे बैरागी...





वाळूंत पाय
सजतेस काय?
लाटांध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
तुझ्या की ओठी....


शून्यांत गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षांत तिथीचा चांद
तुझा की वैरी?

ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment