Friday, 22 January 2010

मानूस


मानूस मानूस
मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा

मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं
गोठयातलं जनावर

भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दुध

मतलबासाठी
मान मानूस डोलये
इमानच्यासाठी
कुत्रा शेपूट हालये

मानसा मानसा,
कधी व्हशीन मानूस
लोभासाठी झाला
माणसाचा रे कानूस

बहिणाबाई चौधरी
संकलन:प्रवीण कुलकर्णी


No comments:

Post a Comment