Thursday 14 January 2010

मी


मी असा का वागतो मलाच कधी कधी कळत नाही
लोक म्हणतात ह्याला कळलं तरी ह्याच्याकडून वळत नाही
मी असा का वागतो मलाच कधी कधी कळत नाही
दोषांचा सुंभ पेटवला जरी पीळ काही जळत नाही,
मी असा का वागतो मलाच कधी कधी कळत नाही
मी म्हणतो तेच खर!याहून विचार ढळत नाही
मी नक्की कोण आहे?
कधी सूत कधी भूत,कधी प्रकाश कधी निराश
कधी देवत्वाची लालीमा,कधी माणुसकीला काळिमा
मी नक्की कोण आहे,मला कसे समजणार आहे?
अस्तित्वाचे गणित माझ्या,मला कधी उकलणार आहे?
मलाच मी ओळखत नाही,इतरांना कसा पारखणार आहे
काहीतरी मार्ग असायला हवा
वळायचे राहिले दूर आधी कळायला तर हवा
काय कसे करावे मार्ग काही दिसत नाही
आशेचा दिवा माझ्या तरी देखील विझत नाही
राजेश गोखले

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....