Monday, 11 January 2010

27-07-2009

२७-०७-२००९
माझा स्वतःचा स्वभाव लिहिण्याआधी मलाच फार विचार करावा लागेल.कारण मी स्वतःकडे जास्त पाहिलंच नाही.आणि आता वही उघडताच तुमच्या प्रतिसादाचे उत्तर वाचले.त्यामुळे याअगोदर २० मिनिटे मी अगदी वेगळाच विचार करत होतो.त्यामुळे ओढून ताणून स्वतःच्या स्वभावाविषयी आताच न लिहिता पुढच्या क्वाईट टाईम मध्ये लिहीन.मात्र,आज एक अशी बाब झाली कि त्यानुसार मी आपल्याशी प्रत्यक्ष बोलल्याप्रमाणे कृतीशून्यतेचा प्रत्यय आला.पण त्यातून एक बाब मात्र निश्चित कि मी किमान पातळीवर विचार तरी करू लागलो.मी एक छोटासा प्रसंग आजच्या दिवसातला लिहित आहे.नंतर या २० मिनिटात मी जो काही बरा-वाईट विचार केला त्यानुसार,झालेली घटना जरी मी बदलू शकत नसलो तरी येणाऱ्या घटना/ प्रसंगाबद्दल आपण मला मार्गदर्शन कराल अशी आशा नव्हे खात्री आहे.तो प्रसंग असा--
'आउटपूट'मध्ये मैडमनी स्वभावदोष व त्याबद्द्दल काय करता येईल?असे विचारले.मी म्हणालो,"जवळपास सर्वच [आता यादी देत नाही] स्वभावदोष कमी-जास्त प्रमाणात माझ्यात आहेत.पण सध्यातरी एक मानसिक व्यायाम म्हणून मी फक्त 'पटकन रियाक्ट न होणे' एवढे करतो आहे.मैडम म्हणाल्या '"गुड".
एकाच तासानंतर साडेचार वाजता शेतात काम करत असताना,गवत काढत असताना भूषण नावाचा सहकारी [सहकारीच म्हणूया!] "कुलकर्णी,तलवार घ्या, कुलकर्णी,तलवार घ्या."म्हणू लागला.एक दोन वेळा मी गप्प बसलो.व नंतर फटकन बोलून गेलो,"तू काही माझा बॉस नाहीस,मालक नाहीस,मी काही तुझा गडी नाही,तू तुझ्यापुरता बघ."बाजूलाच जोशी सरही उभे होते,अर्थात ते काही बोलले नाहीत.
त्यानंतर मला वाईट हि वाटले.म्हणून मी भूषणला 'घाई करू नये'वगैरे म्हणालो.मात्र या २० मिनिटात शांतपणे विचार तेंव्हा त्याचे मूळ जाणवले.क्र.१ मी आज प्रथम शेतात उतरलो होतो.क्र.२ माझ्या पायाला छोटी जखम आहे,त्यावर चप्पलचा पट्टा ओढत असल्याने वेदना होत होत्या आणि त्याच वेळेस तो ओरडत होता.पण एकत्र काम करत असताना असे ओरडणे,उत्साह वाढवणे,हे मलाही नवे नाही.पाय दुखत होता तर मी सरांना सांगून बाजूला बसू शकलो असतो.इतक्या फटकळपणे मी प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती असे आता वाटते.तेंव्हा केली आहेच आपले मार्गदर्शन लाभेलच यात शंका नाही.स्वभावाविषयी पुढील qt मध्ये लिहिणार आहे.आणि खरोखरच साहित्याच्या भाषेत म्हणजे पु.ल.देशपांड्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधील 'लखू रिसबूड' आणि नाटक 'अधांतर' मधील 'बाबा' या दोघांचे मिश्रण म्हणजेमी!

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....