Wednesday 13 January 2010

21-08-2009

२१-०८-२००९
खरं तर विचार हि प्रक्रियाच मला कधी जमली नाही.वडील असेपर्यंत जबाबदारीची व्याख्याच माहिती नव्हती.
वडील वारल्यानंतर मी व्यसनाच्या बुरख्याखाली सोयीस्करपणे 'मला यातले काही कळत नाही' म्हणून हेतुपुरस्सर आर्थिक व्यवहारातून दूर होत गेलो.कारण मला व्यसनाला आवश्यक तितके पैसे घरच्यांनी द्यावे,मग वडिलांचे किती पेन्शनचे पैसे,ग्राच्यूटीचे,फंडाचे पैसे मिळाले ते कोणाच्या नावावर ठेवावे,यात मला कांही रस नव्हता.कारण अव्याहतपणे मी माझ्या नशेत इतका मग्न असे कि,घर कसे चालते,लहान भावंडांचे शिक्षणाचे खर्च कसे चालतात?पैसा आहे कि संपत चालला आहे?या सर्वांशी मला कांही देणेघेणे नव्हते.कदाचित या सर्व प्रकारातून माझ्यात एक अलिप्तता आली असावी कारण,कायम परावलंबित्वाचे नऊ वर्ष मी सोसले आहेत.त्याआधी किमान घरातील किरकोळ कामांच्या तरी जबाबदार्या पार पडत होतो पण वडील वारल्यानंतर आईने जसे काका किंवा इतरांच्या हस्तक्षेपामुळे माझ्या मनात अढी निर्माण होऊन तुमचे तुम्ही काय ते पहा,मी फक्त दारू आणि दारूच पिणार यावर ठाम होतो.यामुळे मी स्वतःचे आयुष्य केवळ दारूच्या स्वाधीन केले.
मला कोणाला दोष द्यायचा नाही किंवा माझे अथवा परिस्थितीचे समर्थन करायचे नाही पण एकंदर वस्तुस्थितीत मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याला माझ्या व्यसनाने मीच बाधा आणली तेथे जबाबदारीची जाणीव कशी असणार?आणि जाणीव जरी असले तरी आजच्या इनपुट मध्ये उल्लेख केलेल्या 'positive भावनांचे बर्डन' किंवा ओझे हा मुद्दा.सर्व चांगले सुरळीत चालू असताना अनेकदा मला दुर्बुद्धी झाली खरी!यामुळे मला सुख मानवत नाही असे वाटते.किंवा आई म्हणते तसे,'बाबा,तला लोण्यात काटे मोडताहेत!'
थोडे विषयांतर झाले तरी मला संभ्रम आहे कि मी अजून तरी फक्त या कार्यक्रमाच्या रूपरेषेच्या भागाचा विचार करतोय तर वैयक्तिक जबाबदारी म्हणजे नेमके काय अपेक्षित,अभिप्रेत असू शकेल?
कारण स्वभावदोष घालवणे,गुणांना वाव देणे हि फार मोठी प्रक्रिया आहे.सरावाचा भाग आहे,पण त्यापेक्षा वेगळे काय करता येईल?
नमस्कार,
वैयक्तिक आयुष्याची जबाबदारी म्हणजे किमान आपल्यापुरता पैसा कमवणे,दैनंदिन गोष्टींची पूर्तता करणे,किमान आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे.हि अपेक्षा आहे.
संगीता जोशी
मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....