Wednesday 13 January 2010

19-08-2009

१९-०८-२००९
याच संदर्भात एक प्रसंग असा घडला होता कि ज्यातून मला जे सांगायचे आहे ते असे कि...
मी follow -up साठी 'मुक्तांगण'च्या कौन्सिलिंग सेंटरला जात असे.मुंबई हल्ल्यानंतर आठ दिवसानंतर एके दिवशी तेथे रेणुताईनी मिटिंग घेतली.बळींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर या हल्ल्यासंदर्भात कुणाला काय वाटले असे त्यांनी विचारले.मी सांगितले,'त्याक्षणी अजून मोठा हल्ला व्हावा असे वाटत होते'.आणि हे मी माझ्या भावाला सांगितले,तर त्यालाही तसेच वाटले'असे सांगितले.
लगेच प्रतिक्रिया उमटल्या,'असे वाटूच कसे शकते?इतके निर्दयी कसे वाटू शकेल?"
यावर मी शांतपणे त्यांना सांगितले,कि प्रत्येक माणसाला रोमांच,थरार हवा असतोच.'युद्धस्य कथा रम्यं'या न्यायाने तो थरार आपल्याला अनुभवता येतो हि सुखद भावना असते.
आपण,आपले कुटुंबीय सुरक्षित आहोत हि दुसरी भावना.[ वाईट वगैरे मलाही वाटले.पण अगदी 'शिवसेने'सारख्या पक्षाच्या विचाराचा असूनही मी सरकारच्या अकार्यक्षमतेबद्दल,सिस्टीम बद्दल बोलत नाही.कारण हे जे लिपस्टिक लाऊन उगाच बोलतात ते मतदान देखील करत नाहीत.याआधी कधी मुंबईवर हल्ले झाले नाहीत?पण ते रेल्वे व बसवर झाले,आता ताज व ओबेरॉय हे ऐय्याशी चे अड्डे उध्वस्त झाले म्हणून आता हे उच्चभ्रू गळे काढताहेत.']
तर मी त्यांना म्हणालो कि,आता आठ दिवस होऊन गेले,तरी तुम्ही महिलावर्ग तुमच्या टी.व्ही.सिरियल्स 'क'च्या बाराखडीतल्या!सोडून तेच तेच न्यूज चैनेलवर क्लिप्स पाहत बसता हि विकृती नाही तर काय?थरार सर्वांनाच हवा असतो.मी प्रामाणिकपणे बोललो हे चुकले का?
तशीच दुसरी गोष्ट शेतकर्यांच्या आत्महत्या हा एक चर्चेचा विषय पण विरोधी पक्ष किमान आंदोलन तरी करतात पण कितीजणांना वाटते कि आपण किमान आपल्या एका दिवसाचे उत्पन्न स्वतःहून एखाद्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला द्यावे?जो तो income tax कसा वाचवता येईल ते पाहतो.
१५ ऑगस्ट ला जीव देण्याच्या गप्पा फारजण करतात.पण देशासाठी जीव देण्याऐवजी जीव जगवणे/जगणे फार अवघड आहे याचे मला भान आहे.पण मी हे सर्व थोड्या टोचणाऱ्या भाषेत बोलतो,कदाचित मलाच त्याचे पुन्हा आपण चुकीचे कांही बोललो काय असे वाटून एकतर मी बोलणे टाळतो किंवा गप्प राहतो.
आपल्याला नेमकेपणाने बोलता येत नाही किंवा आपल्या बोलण्याने दुसर्यांच्या भावना दुखावतील का?असा विचार करून मी मतप्रदर्शन करत नाही.योग्य व्यासपीठ असेल तर हा दोष असेलही पण ते मला जमत नाही,त्यामुळे बरेचसे विचार मनातच राहतात.
नमस्कार,
कोणत्याही सार्वजनिक घटनेबद्दल आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतंच कदाचित त्याच्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात पण 'हे माझ वैयक्तिक मत आहे.'असा stand तुम्हाला का घेता येत नाही?आणि उगाच गप्प राहण्यापेक्षा,गुडीगुडी बोलण्यापेक्षा स्पष्टपणे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
पुन्हा मूळ प्रश्न तसाच राहतो.फार मोठ्या देशहितासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी नाही पण माझ्या वैयक्तिक आयुष्याची जबाबदारी मला का घेता येत नाही?
संगीता जोशी
मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....