Tuesday 12 January 2010

17-08-2009

१७-०८-२००९
आज आउटपूट चा विषय होता,तुम्ही तुमच्या आयुष्याची चौकट का मोडू शकत नाही?तर मला वाटते कि मी कांही अविवेकी पूर्वग्रह व नवीन कांही स्वीकारण्याचा अभाव,न्यूनगंडातून आलेला अहंकार यामुळे मी चौकट मोडू शकत नाही.तसेच मी लवचिक नाही कारण दृष्टीकोणात्मक बदल स्वीकारण्याचे जरी मी मान्य करीत असलो तरी ते माझ्या आत्मकेंद्रीपणाचे निदर्शक म्हणून ते स्वार्थीपणाचे लक्षण ठरते.मात्र,परिस्थितीच्या अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही स्थितीत तटस्थ भूमिकेतून मी तत्वांशी प्रतारणा न करता,कांही निर्णय घेतलेले आहेत.व माझ्या स्वहिताला धक्का न लागता दुसर्यांना ते मान्य झाले आहेत.अशी परिस्थिती केवळ अपवादात्मक होती हे मात्र कबूल करावयास पाहिजे.
मनमोकळेपणा व इच्छाशक्तीचा अभाव यांच्यामुळे बर्याच साध्या साध्या,सहज गोष्टी मी करू शकलो नाही.साहजिकच यातून स्वतःभोवती एक कोश विणून घेत एकाकीपणा,मानुसघानेपणा पदरात पाडून घेतला.
अर्थात आता यातून जमेची बाजू अशी कि,या दिवसांत दृष्टीकोणात्मक बदल हळूहळू स्वतःला जाणवत आहेत.किमान पातळीवर मला जाणीव व्हायला लागली आहे कि,एक मानसिक व्यायाम म्हणून तटस्थपणे एखाद्या काल्पनिक घटनेचे,प्रसंगाचे विश्लेषण करणे,,त्यातून आपल्या कायकाय चुका होत्या,ते तपासणे,इत्यादी.
बऱ्याचदा वाटत असते कि,आपण केवळ दारू पितो म्हणून वाईट वागतो पण खरेच दारू केवळ प्रकट करते.मूळ माझ्या स्वभावातच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल.
स्वतःला त्रास होणार नाही,इतरांना त्रास होणार नाही किमान एवढे माझे वर्तन सुधारावे असा प्रयत्न मी करणार आहे.अगदी नराचा नारायण कुणी होत नाही हे मला माहिती आहे.आणि rebt चे किंवा मानसशास्त्राचे चार तास करून मी कांही लगेच शहाणा होणार नाही पण जे कांही थोडेफार समजेल ते कृतीत कसे आणता येईल यावर माझा भर आहे,कारण माझा मुख्य प्रोब्लेम तोच आहे.
त्यामुळे किमान tda पासून सर्व व्यवस्थित करत आहे.
नमस्कार,
मी मागच्या आठवड्यात qt तपासू शकले नाही याबद्दल क्षमस्व.मी तुमचा सगळ्या दिवसांचा qt वाचला.त्यातून जे कांही तुम्हाला तुमच्यात बदललेलं जाणवतं आहे त्यासंबंधी एकदा बोलूया.
माझ्या मते कोणताही मनुष्य वाईट नसतोच,समस्या निर्माण होते तिथे,जिथे तो विघातक गोष्टींमध्ये आनंद घ्यायला लागतो.जेंव्हा तुम्ही स्वतः पलीकडे बघूच शकत नाही तोच त्याचा स्वभाव बनतो.आणि मुख्यत्वे तुम्हाला त्याच्यावरच काम करावे लागेल.
संगीता जोशी
मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....