Tuesday, 12 January 2010

14-08-2009

१४-०८-२००९
आजच्या इनपुट मध्ये जे उपव्य्क्तीमत्वाचे दोन प्रकार पहिले त्यात मी बऱ्याच प्रमाणात क्रिटिक या प्रायमरी सेल्फ मध्ये स्वतःला मानतो कारण मी बऱ्याच प्रकारे तसा आहे.
मात्र टीका अथवा समीक्षा याचा इथे फक्त नाव ठेवण,दोष काढणे एवढाच मर्यादित,ढोबळ व संकुचित अर्थ घेतला आहे.जो छिद्रान्वेशी असाच होतो.
वस्तुतः टीकाकार वृत्तीचा माणूस टीका करताना त्यातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतो.त्यालाही हे माहित असते,कोणीही परिपूर्ण नाही.पण एखादी घटना,एखादी व्यक्ती,क्तृती मी जेंव्हा बघतो तेंव्हा मला त्यातली त्रुटी/कमतरता चटकन लक्षात येते.याचा अर्थ,गुणग्राहकता हा दुसरा पैलू देखील याच्याशी माझ्यामते निगडीत असावा.
उठसुठ किरकोळ कारणांवरून नावे ठेवणे वेगळे.पण ती कटकटी/त्रासिक वृत्ती असू शकेल.पण टीकात्मक वृत्ती म्हणजे नेमका दोष ओळखणे यासाठी,काय बरोबर आहे हे समजण्याची पात्रता देखील असावी लागते.
उदा:मला भाजी अथवा मटन चांगले करता येते.पण तेच माझ्या मित्राने,भावाने केल्यास मी बरोबर ओळखतो.सांगतो,अरे,कोथिंबीर,अद्रक,लसून बरोबर पेस्ट करून टाकली असतीस तर अजून छान झाले असते.
ती भाजी मला तितकीशी आवडलेली नसते,तसेच कांही पूर्वानुभव,गृहीतके [मग मात्र ती चुकीचीही असू शकतात.] यानुसार मी विशिष्ट गोष्टींवर मत देऊन मोकळा होतो.असे असेल तर हि देखील एक बाजू आहे.कारण आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे फक्त बाजू बघायच्या आहेत.त्याच प्रमाणे 'प्लीजर' ची हि एक बाजू आउटपूट मध्ये थोड्या प्रमाणात असल्याचे लक्षात आले.
आपण जे दुर्लक्षित सेल्व्ज दडवून ठेवतो ते जे लोक प्रदर्शित[एक्स्प्रेस ] करतात त्यांच्याकडे आपण चटकन आकर्षित होतो या विधानावर थोडा संभ्रम आहे.पुढील इनपुट मध्ये तो भाग येईलच.पण टीकाकार केवळ नावे ठेवतो,हे मला मान्य नाही.त्याला ते ते पूर्ण माहित असतं तेंव्हाच तो बोलतो कारण त्याला ते परिपूर्ण व्हावं अशी प्रामाणिक इच्छा असते.असो.
आजच्या आउटपुटचा अभ्यास म्हणून मैडमनी 'जबाबदारी'शी संलग्न तुम्ही कौटुंबिक,सामाजिक,नोकरीच्या ठिकाणी अशा ज्या ज्या भूमिकेत तुम्ही वावरत होता,त्या त्या जबाबदाऱ्या तुम्ही घेतल्या का?याविषयी विचारले होते.
याविषयी खरोखरच विचार केला असता उत्तर नकारार्थी होते.कारण स्टीवन कोवेच्या व्याखेनुसार 'वेगळा प्रतिसाद देण्याची माझी क्षमता म्हणजे जवाबदारी'या मापदंडावर मी कुठेच उतरत नाही.तर यापढे केवळ मर्यादित अर्थ न घेता जबाबदारी म्हणजे चेतना+प्रतिसाद याला बुद्धीची जोड देऊन अधिक योग्य पर्यायी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन.
दुसरा मुद्दा होता सेल्फ डायरेक्शन,स्वदिशादिग्दर्शनाचा,याचा कधीच विचार केला नाही.आणि तसा प्रयत्नही केला नाही हे खरे आहे.मी आता म्हणतो कि,माझे निर्णय आता दुसर्यांच्या हातात आहेत,सद्यपरिस्थितीत ते योग्यच आहे पण हि परिस्थिती मीच ओढवून आणली आहे याची मला जाणीव होत आहे.यामागे देखील केवळ मद्यपान हेच कारण नसून कांही अविवेकी पूर्वग्रह हि कारणीभूत असावेत.
या दोन्ही मुद्यांतून खालील दोन गोष्टींचा चुकीचा विश्वास खोडून टाकण्यास मला मदत झाली.
१. मला वाटायचे कि जवाबदारी टाकली कि जबाबदारी घेता येते.पण ते चुकीचे आहे हे पटले.कारण जवाबदारी टाकावी लागत नाही ती,आपोआप येते,घ्यावी लागते!२. स्वयंनिर्णय घातकी ठरतील हि शंका पण अनुभवातून कळले कि जर मी स्वतःच कांही निर्णय घेतले असते तर फायदाच झाला असता.पण दारूमुळे मी निर्णयच घेत नव्हतो.त्यामुळे इतरांनी घेतलेले निर्णय चुकीचे ठरून मला नुकसान सोसावे लागले.त्यापेक्षा कदाचित न पिता मी चांगले निर्णय घेऊ शकलो असतो,पण विचार करण्याच्या प्रक्रियेलाच मी सुरुवात करत नव्हतो तर निर्णयापर्यंत कधी येणार?
त्यामुळे आजच्या दिवसात या दोन सकारात्मक गोष्टीनी विचार करायला मिळाला.
उद्या ६२वा स्वातंत्र्यदिन.जरी आपण 'स्वाईन फ्लू' च्या छायेत असलो तरी स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
आपल्याला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!!

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....