Tuesday, 12 January 2010

10-08-2009

१०-०८-२००९
माझ्या वर्क पेपर मधील मार्गदर्शनात आपण कांही वर्तणुकीसंबंधी प्लान आहेत का?असा प्रश्न विचारला,तर माझ्या मते 'कृपात' ज्याला तीन गोष्टींवर पाया म्हणता येईल तो आहे,विचार-भावना-वर्तन.
माझ्या विचारांचा आणि भावनांचा कृतीशी कुठेच मेळ बसत नाही हि खरी समस्या आहे.खरे तर आयुष्यात मी पहिल्यांदाच एवढे व खरे लिहिले आहे.
यात अवजड शब्द नाहीत,कल्पनारम्यता नाही,अलंकारिक भाषा नाही तरी तुम्ही मला बुद्धिमान वगैरे म्हटले याचे हसू आले.कारण माझे आयुष्य टिंगलटवाळी करण्यातच गेले आहे.भाऊ व नजीकचे एक दोघे सोडले तर कुणालाही मी अंतर्मुख होणारा वगैरे वाटत नाही. एक टवाळखोर,उद्धट,खुशालचेंडू,आडमुठा असे माझे व्यक्तिमत्व कृतीमुळे बनले आहे.
एक साधा प्रसंग सांगतो_मी नोकरी करत होतो तेंव्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.तेलंग हे होते.ते स्वभावाने तापट होते,त्यात त्यांना बी.पी.चा त्रास होता.पण कोणत्याही विषयावर बोलण्याच्या प्रविण्याने ते माझ्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागत अर्थात त्यांनाही माझ्या उद्धटपनाचा त्रास ४/५ वेळा सहन करावा लागला होता.तर एकदा मी रजेचा अर्ज दिला.विषय वगैरे व्यवस्थित टाकून दिलेला होता.डॉक्टरांनी मला हाक मारली व विचारले,हे काय लिहिले आहे?खाली पहिले.
'उपरोक्त विषयी सविनय विनंती कि..'डॉक्टर हसून म्हणाले कि,"कुलकर्णी,आपला आणि विनयाचा कांही संबंध?" हा उपरोध मला कळला कारण अधिकारी आपले वर्तन हि पाहतात.त्याचप्रमाणे एखादे दिवशी गप्पा मारताना मी थोडे तत्वज्ञानपर [phylosofical ] बोलू लागलो तर लहान बहीण लगेच म्हणते,"बाळू,अरे तुझ्या तोंडात हि भाषा शोभत नाही रे!"
त्यामुळे मी किती उच्च विचार करतो,माझ्या जाणीव किती प्रखर आहेत,मी किती संवेदनशील आहे,किती भावनाप्रधान आहे ,या गोष्टी आपोआपच गौण ठरतात.कारण माझे वागणे-बोलणे!
'टवाळा आवडे विनोद " टाईप मध्ये असते.त्यामुळे जे काही स्वभावदोष आहेत त्यांची सविस्तर यादी करून एक वेगळी वही करून विश्लेषण करणे,त्यावर उपाय योजने हे माझे प्राथमिक उद्दिष्ठ आहे.कारण तसेही दारू न पिता २-३ महिने राहून तसेच वागणे,परत पिणे त्यासाठी आताच जी काही चिरफाड होईल त्यातून कांही चांगलेच साध्य होईल.फक्त इतके दिवस दिशा मिळत नव्हती.
सत्य स्वीकारणे अवघड आहे,पण ते मला कळले आहे असे भासवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.म्हणून कांही स्वभावदोषांवर सरावाने तर कांहीवर मनोरंजन म्हणून हि काम करत आहे.
सध्या तरी आपल्यापेक्षा जास्त शहाणी माणसे आहेत हा सरावाचा भाग करत आहे.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....