Tuesday, 12 January 2010

07-08-2009

०७-०८-२००९
आज नेमका याच विषयाशी निगडीत 'इक्बाल'हा सिनेमा इनपुट च्या वेळी दाखवण्यात आला.
कथानक अर्थातच उत्तम.तांत्रिक बाजू,अभिनय ठीक पण आपल्याशी निगडीत असे आउटपुट मध्ये अनेक मुद्दे निघाले.त्यात कळीचा किंवा तुम्ही जसे आता विचारले तसा प्रश्न होता कि,'तुमच्या आयुष्यात अशी [नसिरुद्दीन शहासारखी] वेळ आली तर तुम्ही काय कराल?असे कोणते ध्येय होते कि ते न मिळाल्यामुळे तुम्ही व्यसनाकडे वळलात?
अर्थात माझ्याकडे ध्येय कधीच नव्हते,आताही नाही.आयुष्याचा गंभीरपणे विचारही कधी केला नाही.कारण याचेही बीज कुठेतरी मागील माझ्याच भरकटलेल्या विचारातच असावे.कारण जगायला फार पैसा लागत नाही हि माझी अजूनही ठाम धारणा आहे.एखादी लहानशी टपरी टाकूनही उदरनिर्वाह होऊ शकतो.त्यामुळे अभ्यास करा,करियर करा वगैरेची भानगडच नाही.शाळा,कोलेज कधीच नाही.परीक्षेच्या एक दिवस अगोदर गाईड वाचून जायचे.४५/५० मार्क्स कसेही पडतात.मग वर्षभर का टेन्शन घ्यायचे हा साधा विचार होता.
सध्यादेखील बाहेर गेल्यावर काय करणार माहित नाही.पण कमीतकमी दारूपासून लांब राहण्याचा शहाणपणा करणार आहे कारण जरी काश्मुळे, कुणामुळे हा जरी विश्लेषणाचा भाग असला तरी आता माझी कमीतकमी शारीरिक नुकसान व मनस्ताप भोगण्याची तयारी नाही.त्यामुळे 'वन डे ऐट टाईम' प्रमाणे जास्त ताण न घेता दारू तरी नाही पिणार.
पैसा कमवणे हे कधीच माझ्या ध्येयात बसणार नाही कारण जेवढी माझी मर्यादा मला माहिती आहे त्याप्रमाणे तोही मिळउही शकत नाही.पण सद्यस्थितीत त्याची मला किंवा कुटुंबियांना त्याची गरजही नाही.पण माझ्या आवडला साजेसे काम [अगदी कोणतेही] भावाशी चर्चा करून येथे मिळेल का?पाहीन,नाहीतर अजून कांही पर्याय असू शकतात.कारण सध्या तो प्रश्न नसून मला बाहेरच्या जगात २ महिन्यांच्या वर न पिता राहता येणे हाच माझ्या दृष्टीने मोठा प्रश्न आहे.
शिवाय आयुष्य हे फार थोड असतं अजून मला बरंच कांही शिकायचं आहे.एखादा कोर्स हि करेन त्यामुळे कांही शिकायलाही मिळेल आणि वेळी जाईल.इथे तर आयुष्य पुरणार नाही एवढे शिक्षण आहे.
नमस्कार,
व्यसन हा सर्वव्यापी आजार असल्याकारणाने वैचारिक गोंधळ पण होतातच.जर याक्षणी आपलं जिवंत राहणं याच गोष्टीच महत्व सगळ्यात जास्त असेल तर व्यसनापासून शारीरिक दृष्ट्या लांब राहणं अत्यंत आवश्यक आहे.इथल्या तीन महिन्यांच्या कालावधीत हे शक्य होणारच आहे.
जे कांही भविष्यकालीन प्रश्न आहेत ते आपण तेंव्हाच सोडवण्याचा प्रयत्न करू.परंतु भविष्यात आपल्याला काय समस्या येऊ शकतात याची मात्र आपल्याला जाणीव असणे गरजेचे आहे.
संगीता जोशी
मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....