Tuesday, 12 January 2010

05-08-2009

०५-०८-२००९
आज राखी पौर्णिमा,बागेत tda झाल्यानंतर पाच-सव्वापाच वाजता कदाचित इथल्याच कुठल्याशा वस्ति किंवा शाळातिल छोट्या छोट्या मुली आम्हाला राखी बांधायला आल्या होत्या.छान वाटले पण मनात वाईट ही वाटले.कारण माझी गेल्या वर्षीची राखी पौर्णिमा देखिल एक व्यसनमुक्ति केन्द्रातच गेली होती.तेथे व्यसनमुक्ति केन्द्रातच काम करनाऱ्या 'सहचरी'या व्यसनाधीन बांधवांच्या पत्निन्च्या गटानी आम्हाला राखी बांधली होती.
त्यावेळी काहींनी मोठे भावनाप्रधान वगैरे होउन रक्षाबन्ध्नाची भेट म्हणून आम्ही निर्व्यसनी राहणार असल्याचे सांगितले होते.ते किती खोते होते हे आज कळते.
त्यासाठी आज जे काही दोन-चार लोक बोलले त्यांनी त्यांना फ़क्त आशीर्वाद दिले हे बरे झाले!
रविवारी भाऊ आला होता,त्याला भाच्याबद्दल विचारले,तर तो[वय७ महीने]मला मी इथे आल्यावर ४/५ दिवस इकडे-तिकडे पाहत असे असे कळले.मलाही चार दिवस करमले नाही.कारण जवळपास ३ महीने तो सतत माझ्या जवळ होता.मी त्याला फिरवत होतो,खाऊ घालत होतो,झोपवत सुद्धा होतो.
आपण आपल्या कार्यक्रमात तिसर्या पायरित म्हणतो की,'आम्ही आमची इछाशक्ति व् जीवन सम्पूर्णपणे परमेश्वरावर सोपवून दिले'.
पण जेंव्हा माझ्या संदर्भात मी विचार करतो तेंव्हा जसे लहान मूल झोप आल्यावर किंवा इतरही वेळेस बिनदिक्कतपणे,मग तो घेणारा कोणीही असो त्याच्याकडे मान टाकतो [सोपवतो] ही सहजता माझ्यात आहे का?जर नसेल तर कशी येइल?
निकोलो मेक्व्हली म्हणतो त्याप्रमाणे कदाचित मनुष्य जन्मतः स्वार्थी,क्रूर,लबाड,धूर्त असेलही पण या आजच्या सणासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतुनच आम्हा मानसातुन उठ्लेल्यांना,माणुसकीची वीण अजुन धरून आहे,ती जपाविशी वाटते.
नमस्कार,
तुमच्या स्वभावातिल प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणा खुपच छान आहे.परंतू स्वतःच्या हितासाठी त्याचा काहीच का उपयोग होत नाही?जे उत्तमपने कळत,ज्याच्यातिल फोलपना कळतो ते वळत का नाही?
तुम्हाला कोणत्या प्रकारच आयुष्य अपेक्षित आहे?आयुष्यात निश्चितपणे काय कराव?असा तुमचा विचार आहे?
तुमच्या लक्षात येत आहे की नाही मला माहीत नाही,ध्येय नसल्यामुळे उत्तम बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व वाया जाणार आहे.तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा,आयुष्याविषयी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
संगीता जोशी
मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....