Monday 11 January 2010

03-08-2009

०३-०८-२००९
आज सकाळी इनपुट मध्ये जे मानवी स्वभावाबद्दल उपव्यक्तीमत्व म्हणू शकू याबद्दल प्रथम तर साध्या भाषेत प्रायमरी सेल्फ ऐवजी प्राथमिक बाजू आणि दुर्लक्षित बाजू असे मला थोडक्यात समजले.
१.भिडस्त:कायम दुसऱ्याला खुश ठेवणारा,स्वतःच्या हक्काची जाणीव नसणारा.याबद्दल मी स्वतःबद्दल विचार केला कि,आपण खरोखरीच असे आहोत का?
व्यसनकाळा अगोदर किंवा मर्यादित व्यसन काळात मी विचार केला तर कांही मर्यादित घटनेत मी अगदी तसाच आहे.पण मैत्री,समाज ऋणानुबंध,माणुसकी किंवा नातेसंबध यातून या सहज घडणाऱ्या घटना आहेत.
पण उदा:मी एक-दोन वेळा माझ्या क्वालेजचे फिसचे पैसे देऊन अडचणीत आलो.पण मी ते लेट फीसहीत वसूल केले.भरले.एखादे वेळी हजार-दोन हजाराचा फटका बसला असेल पण जास्त आर्थिक व्यवहार मी केलेच नाहीत त्यामुळे तो अनुभव नाही.
मित्रांना सोडायला जाणे,भलेही ते माझ्यापेक्षा इतरांना वेळ देत असतील,बर्याचदा मला ते नको असायचे,पण मी जायचो.
ओफिस मध्ये मी नियमित साफसफाई करीत असे.कारण विनाकारण बोलणे मला नको वाटे.अर्थात हा कामाचा भाग झाला,जे करत नसत ते बोलणेही खात.पण हा जो दुसरा विशेष भाग..
पुशर:तो मात्र मला माझ्यात असावा असे वाटते.कारण क्र.१मल लहानपणापासून व्यायामाची आवड होती,मी सकाळी ४ पासून गल्लीतील मुलांना उठवून घेऊन जात असे.
क्र.२ क्रिकेट:उन,पाऊस,थंडी कोणत्याही मोसमात संध्याकाळी ४ते६ किंवा दिवस मावळेपर्यंत किंवा सुट्ट्या असतील तर सकाळपासून,जेवणवेळ सोडून दिवसभर आणि रात्री दिव्याखाली सुद्धा क्रिकेट चाले.आम्ही अनेक टुर्नामेंट्स जिंकल्या पण त्यासाठी सरावासाठी मी सर्वात आधी सर्वांना बोलावून घेऊन जी.कित्येक मुले तर मी लांबून दिसताच घरच्यांना खोटे सांगायला लावत कि मी घरी नाही.
क्र.३ सार्वजनिक उत्सवात पावतीपुस्तक छापण्यापासून ते खांब रोवण्यापर्यंत सर्व कामात काम करवून घेणे,स्वतः करणे,प्रसंगी मदत मागणे,नवीन कल्पना लढवून आर्थिक मदत उभी करणे असे अनेक उपद्व्याप करत असे.
क्र.४ दारू पिणे,जेवणे हे एखादे काम असल्यासारखे हातावेगळे करणे.अगदी पहिल्यांदाच बियर प्यालो तेंव्हा एकाच दमात हातभट्टी एक तांब्या,देशी दारू ,३० सेकंदात क्वार्टर,याचे उदाहरण म्हणजे,कार्यालय सुटल्यानंतर गाडी ५ वाजता येते व उस्मानाबादला ५.४५ ला पोचते.तर मी ३कि.मी.चालत जाऊन लमाण तांड्यावर हातभट्टी ची दारू पीत असे.कारण लवकर मिळते,पटकन होते,पटकनचढते!

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....